भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू

नागपूर : ४ मे – सहा महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलने नागपूरहून बालाघाटला (मध्य प्रदेश) जायला निघालेल्या एका दाम्पत्याचा अपघात झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने वडील व चिमुकल्याचा मृत्यू झाला. कन्हान (ता. पारशिवनी) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी शिवारात दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश मदनलाल चौधरी (३0) व साहील शैलेश चौधरी (६ महिने) अशी मृत वडील व चिमुकल्याचे नाव असून, मीना शैलेश चौधरी (२५) असे जखमी आईचे नाव आहे. शैलेश चौधरी हे मध्यप्रदेश येथील रहिवासी असून, ते काही वर्षांपासून कुटुंबीयांसह नागपूर शहरातील समतानगर येथे राहत होते.

Leave a Reply