नवी दिल्ली : २३ मार्च – महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि त्यांच्याशी संबंधितांवर ई़डीकडून कारवाई करण्यात येत आहे. नवाब मलिकांवर कारवाई केली गेली आहे. पुष्पक ग्रुपवर ईडीने कारवाई केली आहे. ६ कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अडचणीत आले आहेत. आता या सर्व कारवाईवर अमरावतीच्या खासादर नवनीत राणा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाखी परिस्थिती आहे, असे नवीन राणा म्हणाल्या आहेत.
नवनीत राणा या संसदेच्या अधिवेशनासाठी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लती त्यांनी हे विधान केलं आहे. ईडीची कारवाईची आणि त्यात महाराष्ट्रातील बडे नेते अडकल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन राणा यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात कायद्याचं उल्लंघन झालं आहे. राज्यातील सरकारवर महाविकास आघाडीतील नेतेच नाराज आहे. खासदार नाराजी व्यक्त करत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.
शिवसेने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यावरून नवनीत राणा यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेचे नेते शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निवडणुका या बाळासाहेबांच्या नावाने लढल्या आणि त्यांच्या नावावर जिंकल्या. पण आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. यामुळे ते आता जनतेत जाऊन संपर्क करत आहेत. पक्षाचा जो दृष्टीकोन आणि भूमिका आहे, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण याने काही फरक पडणार नाही. विदर्भातील जनता हुशार आहे. कशाप्रकारे लालच दाखवलेलं गेलं होतं, हे जनता ओळखून आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.
विदर्भात पक्ष वाढवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी शिवसेनेने काम सुरू केले आहे. यावरूनही राणा यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. विदर्भ विकास मागे असला तरी नागरिक मात्र हुशार आहेत. नागरिका स्वतःहून निर्णय घेतात. राज्यात शिवसेने ज्या प्रकारे लोकशाहीची पायमल्ली केली आहे, त्यामुळे विदर्भाची आणि महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार, असे नवनीत कौर राणा म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर इडीने कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील ११ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी जोशी आणि श्रीधर माधव पाटणकर यांच्या संयुक्त मालकीची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.