खा. संभाजीराजेंनी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु, राजेंना आज वर्षा निवासस्थानी चर्चेचे आमंत्रण

मुंबई : २८ फेब्रुवारी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गेले दोन दिवसांपासून आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजेंनी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यानंत मराठा आरक्षण प्रश्नावर या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संभाजी राजेंना आज वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले आहे. नुकतीच त्यांच्याशी गृमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजी राजेंची आझाद मैदानात जावून भेट घेतली होती.
राठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे, ते देखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजे यांची प्रकृतीदेखील महत्त्वाची आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगण्यात येती अशी प्रतिक्रियां वळसे पाटील यांनी दिली होती. हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचही पाटील म्हणाले होते.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरु झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंच्या उपोषण स्थळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज भेट देऊन संभाजीराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि उपोषण संपुष्टात आणण्याची मागणी संभाजीराजे यांच्याकडे केली. मात्र, राजे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आजाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. 17 जूनला राज्य सरकार सोबत चर्चा केली होती. पंधरा दिवसात राज्य सरकार कडील सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याच मागण्या घेऊन उपोषणाला बसावे लागत आहे अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. उपोषण सुरू करण्याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Reply