११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने गिरड परिसरात दहशत

वर्धा : २ ऑक्टोबर – गिरड परिसरातील मोहगाव येथे अरुण ठाकरे यांच्या घराच्या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ११ फूट लांबीच्या आजगराला सर्प मित्र खुशाल शेळके व अमित शेळके यांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार अरुण ठाकरे यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास भलामोठा अजगर आढळून आला. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी या अजगराला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरात ठाण मांडून बसलेला अजगर जागा सोडात नव्हता. त्यानंतर सर्पमित्र खुशाल व अमित शेळके यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने अजगराला जेरबंद करून निसर्गमुक्त केले.

Leave a Reply