सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

जिनके घर शिशे के होते है..

सामनामध्ये अग्रलेख – काळ्या पैशाचे गौडबंगाल – चोराच्या उलट्या बोंबा – झाली संध्याकाळ – ओत खंबा – रिता खंबा – लिहा अग्रलेख – छापा सामनात.
सामना दैनिकात जे काही लिहिले जाते ते म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी, वैचारिक दैना, सुमार विचारशक्ती चे प्रदर्शन, अर्धसत्याचे लिखाण, जनतेची दिशाभूल आणि स्वार्थासाठी वृत्तपत्राचा दुरुपयोग. मामु चा वाढदिवस (माननीय मुख्यमंत्री चा) अरे वृत्तपत्रात एक दोन बातम्या बाकी सगळे वृत्तपत्र मामु च्या फोटोंमध्ये फिटलेले. फोटोग्राफर मामुचे असंख्य मुद्रेतील, असंख्य चाहत्यांचे बहुतेक सक्तीने छापलेले फोटो, बहुतेक जबरदस्तीने उकळलेले अॅडव्हरटाईजमेंट चे पैसे आणि दाखवायला की मामु वाढदिवसाला पेपर मध्ये चमकला पाहिजे. तिकडे महाराष्ट्रातील जनता पूरामध्ये वाहुनी गेली तरी मामु सामना त चमकला. पूरामध्ये जनतेचे हाल झाले तरी तातडीची मदत आम्ही पुर्ण अहवाल आल्याशिवाय आम्ही तातडीने पैसे खिशातून काढणार नाही. केंद्र सरकारने ७१० कोटी तातडीने दिले, त्याचे काय झाले? केंद्राचा जनतेच्या मदतीचा पैसा – गेला कुठे आणि हिशोब कैसा? आम्हाला जनतेची फिकीर फक्त टीव्ही वर लोकांसमोर मुलाखत देताना, एकदा का आम्ही घरात घुसलो की मातोश्री च्या कुशीत आम्ही, मोठ्या निर्णयाच्या नावाखाली लोकांना मुर्ख बनवायला मोकळे. मातोश्री त राहणा-या श्रीमंत मामु ला सांगावे, दोन दिवस पुरग्रस्तांच्या घरात बिना लाईट, गुडघाभर पाण्यात, ओले अन्नधान्याचा स्वयंपाक बनवुन, ओल्या गादीच्या ओल्या खाटेवर झोपुन काढा म्हणजे कळेल, मामु ला तातडीने मदत म्हणजे काय असते? आणि “तातडी” ह्या शब्दाचा अर्थ काय? संवेदना शुन्य मामु, निर्णय घेण्यात शुन्य मामु आणि केंद्राच्या पैशासाठी हपापलेला मामु.
नाही म्हणायला सत्ताधीशांनी परिस्थिती सावरायला फक्त पत्रकार परिषद घेतली. पण ते समयाधीश – एका ही पत्रकाराची ताब नाही की ह्यांना पत्रकार परिषदेत प्रतीप्रश्न महाराष्ट्रात विचारण्याची. मागे एका पत्रकाराने असे धाडस केले होते, त्याला सत्ताधीशांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.
आता पत्रकार परिषदेनंतर तातडीची मदत म्हणून खरेच मदत करतात की पेपरवर मदत करतात हा सर्वस्वी पक्षाचा अंतर्गत निर्णय असु शकतो. खिल्लारी च्या भुकंपाचे वेळी, समयाधीश मुख्यमंत्री होते, अमेरिकेतून पिडीतांच्या मदतीला आलेली ब्लॅंकेट्स, पिडीत लोकांपर्यंत न पोचता, दुकानात उच्या दामात विक्रीला दिसले होते. म्हणून समयाधीश सांगतात की राज्याला Disaster Management चा अनुभव आहे. वरुन सल्ला देतात की अधिकारी व्यक्ती शिवाय कोणीही दौरा करु नये. म्हणजे पिडीतांची स्थिती काय? मदत किती पोचली? ह्या सर्व गोष्टी गुलदस्त्यात. पत्रकार परिषदेत “राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर” मदतीचा आकडा घोषित केला नाही, तो मग कितीही टाकता येतो. हे कदाचित पुर्वानुभवावरून समयाधीश सांगत असावे. पूरग्रस्त जनतेला आतापर्यंत काय मिळाले!!!! कोणी ही सांगत नाही आणि पिडीत जनता अजुनही आपले भोग भोगत आहेत. राज्याकडुन काही मदत मिळाल्याची अजून तरी काही बातमी नाही. फक्त उद्या च्या बाता की १०,००० रुपये पूरपिडीतांना देणार. उद्याचे उद्या आज तरी तुर्तास कांहीच नाही.
आता आपल्या मामु ला कुठली नौकरी किंवा धंदा आहे की मामु ची संपत्ती १४२ करोड घोषित केली आहे. २५ वर्षाची बीएमसी का??? मग हा सगळा पैसा आला कुठून?? मातोश्री २ बनले कसे?? दररोज किरीट सोमय्या बोंबा पाडतात टिव्हीवर, ती नाईकांबरोबर तुमची संपत्ती जमा कशी होते???? वाझे वसुली गॅंग चे सत्ताधारी कनेक्शन कुठपर्यंत पोहोचेल??? ही सगळी जमा केलेली संपत्ती – काळ्या संपत्तीत मोडते. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करुन जेव्हा तुम्ही म्हणाला होता की आम्हाला सुद्धा पक्ष चालवायचा आहे, त्याचवेळी महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करण्याचा वास आला होता. आणि मग जो पैसा तुम्ही अनैतिक मार्गाने जमा करीत आहात, त्याला काळा पैसा म्हणतात. तुमचा पक्ष, तुमची घड्याळ त्याला हाताची साथ – ही सगळे पक्ष काळ्या धनाचे मानकरी आणि आता चोराच्या उलट्या बोंबा ठोकताहात, केंद्र सरकारच्या नावाने.
काळा पैसा – काळा पैसा – काळा पैसा गोंडस बाळ राजकारण्यांचं. मागल्या सत्तर वर्षात स्वतः चे हितसंबंध गुंतलेले. बोफोर्स च्या नावाने विदेशी मासिकात राजीव गांधी चे नाव झळकलेले की ह्यांचे विदेशी खात्यात प्रचंड पैसा आहे. अशी कॉंग्रेस, काय स्विस बॅंकेशी माहिती भारताला पुरवा म्हणून ट्रिटी करु शकते? कधीच नाही.
जे काम कॉंग्रेस करू शकली नाही ते काम सध्याचे सरकारने करुन दाखवले. पण त्यात एक गोची आहे ती अशी की भारत सरकारला स्विस बॅंक खातेदारांची नावे पुरवू शकते पण सरकार वर बंधने आहेत की नावे त्यांनी खातेधारकांची नावे सार्वजनिक करु नये. पण अर्थतज्ञांचे मते सरकार ह्या माहिती वर आधारित खातेधारकांवर कारवाई करू शकते, खात्यातील जमा रकमेचा आकडा सरकारला माहिती होईल अशा अन्य बाबींपर्यंत सरकार पोहोचू शकते आणि ही खरी विरोधकांची गोम आहे.
सामना अग्रलेखात जी “काळ्या पैशाच्या” नावानी आगपाखड केली आहे, त्याचे मुळ कारण हे आहे.
बरे “सामना”ला तुम्ही कसे “परिभाषित” कराल? हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळची शिवसेना नाही म्हणतंय. आजची जनाब बाळासाहेब ठाकरे वाली शिवसेना म्हणतोय.
अर्धवट सत्य अर्धवट सत्य लपवून, स्वहितासाठी जनतेची फसवणूक करीत, पूर्णसत्य छापण्याची क्षमता नसलेले, सत्याचा सामना करु न शकणारे, दैनिक म्हणजे सामना.
ही सगळी मंडळी १५ लाख खातेमे मोदीजी – १५ लाख खाते मे मोदीजी – ही जी भिकारी जमात आहे. आणि आज जे सामना अग्रलेखात भिकेचा कटोरा धारी – मिळाले की खिशात घाली – शिवसेना सामना दैनिकात प्रकाशित झाल्याचे पाहून आश्चर्य वाटले. मी तरी आजपर्यंत कुठलीही व्हिडिओ क्लिप बघितली नाही ज्यात मोदी म्हणाले आहेत की तुमच्या खात्यात काळ्या पैशाचे मी १५ लाख रुपये जमा करीन, मला सत्ता द्या.
त्यांच्या भाषणाचा मतितार्थ असा होता की बाहेर काळा पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जर सर्व पैसा एकरकमी हाती लागला तर प्रत्येकाच्या वाट्याला १५ लाख रुपये येवू शकतात.
अरे ! ज्या मोदींसमोर भिकेचा कटोरा पसरुन, तुम्ही पांढरा पैसा मागता नंतर हातात आल्यावर, जनतेच्या हिश्श्याचा हिशोब न देता, तुम्ही त्याचे रूपांतर काळ्या पैशात करता आणि वर मोदींवर धादांत खोटे लिहीता – हा खरा “सामना” वृत्तपत्राचा चेहरा.
दुसरा प्रश्न काळ्या पैशाच्या काळ्या चेहरेवाल्या सामना – अग्रलेखाचा. दोन हजाराच्या नोटेमुळे काळाबाजारी वाढेल!!! अगदी बरोबर, तुमची सोय झाली तरी तुम्ही बोंबलाल आणि गैरसोय झाली तरी बोंबलाल. ती २००० ची नोट कित्येक काळ्या पैशेवाल्यांच्या पैशाने भरलेल्या आलमारीच्या आलमा-या पैशाची रद्दी बनवून गेल्या. कदाचित शिवसेना पण त्यात असेल. मोठमोठे नेते रडकुंडीला आले ह्या २००० रुपयांच्या चलनामुळे. आणि हा खरा आक्रोश आहे ह्या नोटेचा. २००० रुपये ची नोट मोदींचा मास्टर स्ट्रोक होता, जुन्या १००० आणि ५०० रुपये चे रद्द करण्याचा. सामना नोट करा – जिनके घर शिशेके होते है, दुसरो पर पत्थर नही फेका करते !

भाई देवघरे

Leave a Reply