नागपूर वनविभागाच्या चमूची मध्यप्रदेशात धडक कारवाई

नागपूर : ३० जुलै – नागपूर वनविभागाच्या चमूने मध्यप्रदेशात धडक कारवाई करत वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील बिचवासाहनी या गावातील मोतीलाल केजा सलामे याच्या घरी धाड टाकून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

30 july nagpur vanvibhag 2गुप्त माहितीच्या आधारे नागपूर वनविभागाच्या चमूने बीचवसाहनी या गावात आरोपीच्या घरी धाड टाकली असता आरोपी मोतीलाल केजा सलामे (५५) याच्या शेतशिवारातून एक मृत वाघाची संपूर्ण कातडी, ४ पायाचे पंजे जप्त केले. यासोबतच आरोपीचा मोबाईलही जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजार केले असता त्यांनी आरोपीला ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या दरम्यान आरोपीकडून अधिक गुन्ह्यांची कबुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply