अवैध देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून चार युवतींची सुटका

नागपूर : ३० जुलै – वाठोडा आणि हुडकेश्वर हद्दीत सुरू असलेल्या दोन अवैध देहव्यापार अड्डय़ावर धाड टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चार पीडित युवतींची सुटका केली. तर दोन आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाठोडा हद्दीमधील शालिनी राजू पटले (४५) रा. प्लॉट नं ३१, र्शावणनगर, वाठोडा ही महिला स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारास प्रवृत्त करून समागमाकरिता ग्राहकांना जागा उपलब्ध करून देहव्यापार करवून घेते, अशी खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पोलिस निरीक्षक अढाव यांना याबाबत माहिती दिली. पोलिस पथकाने आरोपी महिलेच्या घरी धाड टाकून दोन पीडित युवतींची सुटका केली. तसेच आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. यावेळी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली. अल्पवयीन मुलीला बाल संरक्षणगृह येथे ठेवण्यात आले आहे. याचवेळी या व्यवसायातील संबंधित महिला विद्या धनराज फुलझेले (४२) रा. संजुबा शाळेमागे हुडकेश्वर हिने पंटरला फोनद्वारे तिच्या राहत्या ठिकाणी बोलविले होते. त्यामुळे ती घरीच अवैध देहव्यवसाय करीत असल्याचा संशय आल्याने पोलिस पथकाने तिच्या घरी धाड कारवाई करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. तसेच तेथून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

Leave a Reply