सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

पेगासस चे द्वारी

मित्रांनो, काल संसदेमध्ये एक विधेयक मांडले गेले होते की, दहशतवाद्याला मदत करणारा जो कोणी आढळला तर तो नागरिक दहशतवादी समजला जाईल. आणि कॉंग्रेस संसदेबाहेर पडली. बिलाला विरोध दर्शविला आणि परत एकदा सर्व जगाला समजावून सांगितले – कॉंग्रेस का हाथ दहशतवाद के साथ! कॉंग्रेस का हाथ आतंक के साथ! कॉंग्रेस का हाथ भारत विरोध में ! हिंदुस्थान अनेक वर्षांपासून दहशतवादाने ग्रस्त आहे. कॉंग्रेस गेली सत्तर वर्षे सत्तेत आहे पण दहशतवादावर तोडगा काढु शकत नाही, ह्याचे एकच कारण कॉंग्रेस नावाचा दहशतवाद – कॉंग्रेस नावाचा आतंकवाद – कॉंग्रेस नावाचा पाकिस्तानवाद गेली सत्तर वर्षे भारतावर राज्य करतोय. हिंदू विरोधी कारवाया करत हिंदू नामशेष करण्यासाठी प्रतिबद्ध आणि वरकरणी हिंदू मतं घेण्यासाठी हिंदू ना मुर्ख बनवून सत्तेत येत आहे आणि आज ही काही हिंदू, कॉंग्रेस साठी आपली मतं देत हिंदू पिढीचे भविष्य अंधकारमय करीत आहे.
कॉंग्रेस दहशतवाद्यांना मदत करते आणि भारतातील हिंदूंची संख्या कमी करण्यात मदत करीत आहे, हे कॉंग्रेसने प्रथमच दाखवले नाही. उदाहरणार्थ, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, हजारो शीखांची हत्या करण्यात आली आणि त्याला “मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते” असे सांगून हजारो शिखांच्या हत्येचे समर्थन केल्या गेले. आणि ते सुद्धा पंतप्रधान राजीव गांधी द्वारा. ४-५ लाख काश्मिरी हिंदू काश्मीरमधून दहशतवाद पसरवून काश्मीर बाहेर घालविण्यात आले. त्यांच्या परिवारांवर अत्याचार हा संपूर्ण वेगळा विषय,पुन्हा कधी. ही मुस्लिम धार्जिणी प्रवृत्ती. आणि आजही त्यांच्यातील काहींना निर्वासित छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. दहशतवादी आणि पाकिस्तानी विचारसरणीने ग्रस्त कॉंग्रेस आज सुद्धा बदलली नाही. आणि भारत विरोधी कारवायात आज ही कॉंग्रेस व्यस्त आहे.
बाटला चकमकीला बनावट चकमक म्हणून वर्णन करताना, शूर भारतीयांवर गुन्हा दाखल केला जातो. खोट्या खटल्यात अडकलेल्या कर्नल पुरोहितला तुरुंगात असह्य अवस्थेत आयुष्याची ९ वर्षे जगणे भाग पाडल्या जाते. भारतात ज्यांना कुत्र्यासारखे मारायला पाहिजे अशा दहशतवाद्यांना, कॉंग्रेस आर्थिक मदत करते. अगदी पेन्शनचीही कॉंग्रेसने व्यवस्था केली जाते. दहशतवाद्यांच्या मरणोत्तर, कुटुंबाला कॉंग्रेस आर्थिक मदतसुद्धा करीत असते. वाचक मित्रांनो – कॉंग्रेस दहशतवाद्यांना आर्थिक मदत काय स्वतः च्या खिशातून करते? कधीच् नाही! मित्रांनो, ही मदत तुमच्या आमच्या टॅक्स मधुन केली जाते आणि आमचाच् घामाचा पैसा आमच्या विरोधात वापरला जात होता. ही गोष्ट किती लोकांना माहिती आहे???? आणि हिंदूंसाठी बावाजी का ठुल्लू. आणि ह्याच विरोधात बिल आल्याबरोबर मात्र कॉंग्रेस, सदनातून विरोधात वॉक आउट करते. ह्याचा अर्थ कॉंग्रेस भारतासाठी एक दहशतवादी पक्ष आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
डॉ. संबित पात्रा अनेकदा म्हणाले आहेत की कॉंग्रेस पार्टी देशात, पाकिस्तानी अजेंडा भारतात आणण्यासाठी काम करत आहे. कॉंग्रेस पाकिस्तानी अजेंडा चालवितात असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा राफेल विमानांची खरेदी अंतिम टप्प्यात होती, तेव्हा ही खरेदी रद्द करण्याचा कॉंग्रेसचा पूर्णपणे विचार होता आणि हा विचार कॉंग्रेस पक्षाने चीन देशाचा अजेंड्यावर आधारित आहे. आणि काही रुपयांसाठी कॉंग्रेस पक्ष, चीन सरकारच्या निर्देशानुसार भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मग गद्दार कोण होता? सोनिया गांधी, राहुल गांधी आणि चिनी प्रतिनिधी यांच्याशी काही सामंजस्य करार करताना न्यूजमध्येही हा फोटो देण्यात आला होता.
माजी मंत्री नटवरसिंग यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की जेव्हा ते अफगाणिस्तानात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत गेले होते, तेव्हा गुप्तपणे इंदिरा गांधींनी त्यांना रात्री बाबरच्या थडग्यावर नेले आणि बाबरच्या थडग्याला सांगितले की आजही भारत आपल्या हातात सुरक्षित आहे. ” .
विशेष म्हणजे जेव्हा राफेल लढाऊ विमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली, तेव्हा राफेल भारतात येवू नये किंवा किंवा जास्तीत जास्त उशीर करावा अशी चीन ची योजना होती आणि राहुल गांधी त्या योजनेला भारतात मुर्त स्वरूप देत होते. मित्रांनो, मला सर्वोच्च न्यायालयावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, परंतु इतक्या मोठ्या देशविरोधी कृत्याची शिक्षा काय होती ??? राहुल गांधींनी “माफीनामा” लिहून द्यावा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात गांधींचे नाणे आज ही चालते – माफीनामा पलिकडे, गांधी कुटुंबाला कोणतीही शिक्षा देण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयात नाही. असे म्हणण्याची जागा, सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे. आणि ही सुप्रीम कोर्टाला काळिमा फासणारी गोष्ट आहे, असे वाटंत नाही का?? कारण जेव्हा “चौकीदार चोर है” ची कहाणी दुस-यांदा कोर्टात आली तेव्हा पुन्हा राहुल गांधींना “माफीनामा” मागितल्या गेला. अर्थ स्पष्ट आहे, गांधीजी, तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत आहात आणि कोर्टाची माफी मागण्यापेक्षा तुम्हाला शिक्षा देण्याची शक्ती, ताकद नाही. असे म्हणण्याची जागा सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
मित्रांनो, जर या ठिकाणी सामान्य नागरिक असते तर आपल्याला माहित नाही की आपले भविष्य काय असेल? कोर्टाने कोणती शिक्षा किंवा दंड केला असता, सामान्य नागरिकांना – राष्ट्रीय सुरक्षेच्या सबबीखाली. राफेल हा मुद्दा भारताच्या संरक्षणाशी संबंधित आहे आणि तुम्ही आम्ही सामान्य जनांना कोर्टाने कुठली कठोर शिक्षा ठोठावली असती. पण ना – गांधी साठी फक्त माफीनामा.
ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे त्याच दिशेने जातात जिथे हे सिद्ध झाले आहे की कॉंग्रेस हा एक दहशतवादी दल, हिंदूंच्या विरोधात असलेला पक्ष आहे. आणि देशद्रोह्यांसाठी – देशा विरूद्ध काम करणारा, मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे.
मित्रांनो, आपण आता जरा मागे जाऊ या. २००० मध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना, फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले होते, ज्यात ९००० फोन टॅप केले गेले होते, काँग्रेस ५०० ईमेलवर बारीक नजर ठेवून होती. आणि जेव्हा ही बाब बाहेर आली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणाले होते! कि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मित्रांनो, ओळ अधोरेखित करा, हे नमूद केले जाईल की तत्कालीन पंतप्रधान म्हणाले होते की भारताच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावी लागली.
म्हणजेच कॉंग्रेसने या सर्व गोष्टी कशा वापरल्या असतील, हा वादाचा विषय आहे.
शिवसेनेच्या सामनाचे उपसंपादक आहेत आणि त्यांना माईक मिळेल तेथे ते जे काही तोंडात येईल ते बरळत असतात म्हणजे स्वार्थाने प्रेरित, अतार्किक, पक्षासाठी वाट्टेल ते आणि मुख्यमंत्र्याला किती चाटु किती नको, किती बटर लावू किती नको असे त्यांचे वक्तव्य देतात म्हणजेच त्यांनी WHO पेक्षा हुशार, वैद्यकीय ज्ञान असणारे म्हणुन आपल्या मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. आता चाटताना पण किती चाटावे याचे भान असावे, पण नाही भर मुलाखती मध्ये हा प्रश्न विचारुन त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की विकेट घेतली हे, फक्त सामान्य लोकांनाच् ठरवु दे. मग ह्या उपसंपादकाचा एक मोठा साक्षात्कार झाला.जबरदस्त ज्ञानी उपसंपादक म्हणतो की डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरना जास्त कळतं, डॉक्टरला काय कळतंय??? तेव्हापासून महाराष्ट्रातील कंपाउंडर बिचारे वाट बघत असतील, आपला पगार डॉक्टर पेक्षा जास्त कधी होणार, ह्याची!!!!!. तर असा हा बुद्धिवादी उपसंपादक हे देखील मान्य करतो की ह्याची बुद्धिमत्ता इतकी लहान आहे की शरद पवारांच्या राजकीय चाली, त्यांची राजनिती समजण्यास शंभर वर्षे लागतील. आता असा हा कमी बुद्ध्यांक असणारे सर्व शिवसेनेत भरती होतात का काय? असा प्रश्न पडतो कारण शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचे प्रचंड अज्ञान आता, नद्यांना ते भिंती बांधणार आहेत. केवढे प्रचंड साहस बोलण्याचे!!!!! तर असा हा उपसंपादक पण आजच्या राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत किंवा दहशतवाद आणि देशद्रोहाच्या म्हणजेच कॉंग्रेसच्या बाजूने उभा राहिला होता. नवल काय? राहुल गांधी च्या जवळ नेहमी असे कमी बुद्ध्यांक असणा-यांचा गराडा असतो.
राहुल गांधी यांनी आज पेगाससवर जोरदार हल्ला केला. स्वागत आहे. हल्ले करायला पण हवे. परंतु तेथे काही तथ्य असणे आवश्यक आहे, बोलण्यात काही तार्किक असणे आवश्यक आहे.
मित्रांनो असे म्हणतात की मुकेश अंबानींच्या त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत इस्त्राईलचा मोसाद (पेगासस इस्त्रायल चे) पहिल्या स्तरामध्ये आहे. आणि जेव्हा स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची माहिती प्रथम तेथून आली आणि त्यानंतर ती मुंबई पोलिसांना पाठविली गेली. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी स्फोटकांनी भरलेले वाहन अंबानी अंटालियासमोर ठेवले आणि दुसरे कोणीतरी जाऊन मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवते. गंमत आहे महाराष्ट्र सरकार मध्ये. मित्रांनो, जर पेगासस ह्या कारणाने वापरल्या गेला असेल तर ते चांगल्यासाठी वापरला गेला. आणि इथेच शिवसेनेची मळमळ आहे. आणि शिवसेनेचा उपसंपादक रोज मिडीयासमोर ओका-या करीत बका बका बरळत असतो.
चला राहुल गांधीच्या प्रेस कॉन्फरन्स मधील वक्तव्याकडे जाऊया.
राहुल गांधींनी जे बोलले ते म्हणजे त्यांच्या विरोधात पेगासस वापरला गेला. पत्रकारांच्या विरोधात.
मित्रांनो, आपले काही पत्रकार, पत्रकारितेत पैसे खाऊन मालकाच्या सोयीनुसार छापतात किंवा मिडीयात बातम्या देतात आणि ख-या पत्रकारितेची खिल्ली उडवतात. अशा काही पत्रकारांना “प्रेस्टिट्यूट्स” म्हटले जाते. ज्यावर आमच्या काही पत्रकारांना अभिमान आहे कारण त्यांना घरी बसून पैसे मिळतात आणि जास्त मेहनत न करता ठरलेली स्क्रिप्ट छापली जाते आणि चुकीच्या छपाईसाठी भारतात दंड नाही आणि म्हणूनच आपली पत्रकारिता आज 142 व्या क्रमांकावर आहे. आणि काही पक्षांची अशी पत्रकारिता म्हणजे मक्तेदारी आहे.
तर मित्रांनो, पत्रकार परिषदेत परत जाऊ या ज्यात राहुल गांधी म्हणतात की त्यांनी पेगासस विकत घेतला आहे की नाही? राहुल गांधींनी तुमच्या मनमोहनसिंग यांना उत्तर दिले आहे, ज्यांच्या सत्तेत 9000 फोन आणि 500 ​​ईमेल कॉग्रेसच्या निगराणीखाली येत आहेत. गोष्ट तीच् आहे फक्त आज तंत्रज्ञान बदलले.
मग तुम्ही म्हणाल की, पेगाससचा वापर सर्वोच्च न्यायालयात आणि प्रेसच्या कार्यकर्त्यांविरूद्ध केला गेला. आपण सर्वोच्च न्यायालयात सहानुभूती का दर्शवित आहात? तुमच्या प्रत्येक चुकीच्या बाबतीत तो तुम्हाला क्षमा करतो आणि अक्षम्य चुकांवर सुद्धा माफीनाम्या वर सोडतो म्हणून? म्हणूनच भारताच्या प्रगतीत अडथळा आणण्याचे आपले योग्य साधन सुप्रीम कोर्टाबद्दल आपले प्रेम उतु जाते आहे का? सुरक्षायंत्रणेशी राहुल गांधी परत खेळत आहे. पत्रकारांबद्दल बोलणे – तुम्हाला कधीपासून पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर दुखायला लागले? काही पत्रकार आपले पाळीव पित्तु देखील असतील, पेगाससने त्यांच्यावर केलेली निगराणी केले किंवा अशी माहिती उघड झाली की अशी काही माहिती भारत सरकारकडे आली की आपला पाया हादरला आहे. आणि मग आपण म्हणाल्या की आपला स्वत: चा फोन टॅप केला जातो, जो दहशतवादी आणि गद्दार यांच्याविरूद्ध वापरावा. मित्रांनो, हे आधीपासूनच लक्षात घेण्यासारखे आहे की स्वत: राहुल गांधी, पाकचा अजेंडा चालवितात, चीनबरोबर गठबंधन करतात, दहशतवाद्यांना पाठिंबा देतात – हे काल पण संसदेतून बहिर्गमन करीत, परत एकदा दहशतवादी असल्याचे सिद्ध केले आहे आणि जर आपण देशद्रोही असाल तर देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत असे म्हणणारे मनमोहन सिंग. अशा प्राप्त परिस्थितीत राहुल गांधी हे सुद्धा आतंकवादी भुमिका पार पाडत असतील, त्यांना मदत करीत असतील आणि म्हणून जर त्यांचा पण फोन टॅप केला जात असेल तर देश हिताच्या दृष्टीने आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही वावगे ठरणार नाही.
राहुल गांधी, प्राप्त परिस्थितीत, पेगाससच्या नावाखाली भारतीय लोकांच्या हितासाठी चालणारी संसद थांबवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी बनविलेली “घटना” आणि संसद बंद पाडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा अपमान करता आहात, संसद बंद पाडुन. भारताच्या जनतेचा हक्क हिरावून घेता आहात संसद बंद पाडून.
ज्याचे फोन टॅप करायची गरज भारताच्या सुरक्षा यंत्रणेला पडली अशा व्यक्तीला कुठला ही अधिकार राहात नाही, संसदेत हस्तक्षेप करायचा. आपली देशद्रोह्यांबरोबरची जुळलेली नाळ, चव्हाट्यावर आणून कॉंग्रेस चा असली चेह-याचा कोथळा, अजूनही केंद्र सरकारने बाहेर का काढला नाही? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.

भाई देवघरे

Leave a Reply