मिहानमध्ये राफेलचे ‘सर्व्हिसिंग सेंटर’

नागपूर : : २९ जुलै –भारताने संरक्षण दलासाठी फ्रान्सच्या एका कंपनीकडून खरेदी केलेल्या राफेल या युद्ध विमानाचे सर्व्हिसिंग सेंटर मिहानमध्ये उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी)ने द सॉल्त रिलायन्स एअरोस्पेस लि. (द्राल) सोबत भूखंड भाडेपट्टी कराराचे प्रारूप अंतिम केले आहे. त्यानुसार द्राल मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील त्यांचा भूखंडचा काही भाग द सॉल्त एव्हिशन कंपनीला लीजवर देण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे फ्रान्सच्या या कंपनीचा मिहानमध्ये राफेल या युद्ध विमानाचे सर्व्हिसिंग सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी प्रारूप अंतिम झाल्याचे सांगितले. फ्रान्सची ही कंपनी राफेल विमानाचे सर्व्हिसिंग सेंटर पुढील एक ते दीड वर्षांत येथे सुरु करणे अपेक्षित आहे. द्रालला मिहानमध्ये १०४ एकर जागा देण्यात आली आहे. मिहानमध्ये सध्या टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल आयटी कंपन्या कार्यरत आहे. इन्फोसिसने देखील त्यांचे बांधकाम सुरू केले आहे, असेही कपूर म्हणाले.

Leave a Reply