नारायण राणेंनी केले प्रवीण दरेकरांना केले सर्वांसमक्ष चूप, व्हिडीओ व्हायरल

चिपळूण : २८ जुलै – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नारायण राणे हे प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांबवल्याचा अंदाज आहे.
याआधी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

Leave a Reply