मुंबई : २७ जुलै – उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत आणि ते देशाचे नेतृत्व करतील याची मला खात्री आहेअसे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले आहे. खा. संजय राऊतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल, तर आनंदच आहे.
दरम्यान, राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.