वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पंतप्रधान होता होता !

पंतप्रधान होता होता राष्ट्रपती जाहलो
अभावात प्रत्यक्षाच्या भावी बनुन पावलो !

अम्ही काय कुठले मोठे स्वप्न ना पहावे ?
आणि त्याच्या प्राप्तीसाठी यत्न ना करावे ?
विविध पदे भोगुन सुद्धा अतृप्तच राहिलो ! ।। अभावात ….

स्वाभिमान जपण्या आम्ही मूळपक्ष सोडला !
भोगण्यास सत्ता आम्ही स्वाभिमान सोडला !
इटालियन मातेपुढती पुन्हा पुन्हा वाकलो ! ।। अभावात …

साडेतीन जिल्ह्यांचेच आम्ही अधिपती !
सत्ता राखण्याला करतो नाना उचापती !
काहितरी द्या हो तुमच्या द्वारी उभे ठाकलो ! ।। अभावात …

स्मशानात गेल्या अमुच्या गोवऱ्या नि लाकडं !
शेपुट हे अमुचे आहे जन्मजात वाकडं !
कुणाशीही जांगडबुत्ता जमविण्यास थांबलो !।। अभावात ….

     कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply