मोदींच्या संमतीने नारायण राणे कोकणच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, राणे, दरेकर आणि फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

रत्नागिरी : २५ जुलै – राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पूर असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा सर्वात जास्त फटका कोकणाला बसला आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतो आहे, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आज एकाच दिवशी चिपळूणमध्ये आहेत, हे विशेष.
नारायण राणे हे दिल्लीहून कोकणात रवाना झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही कोकण दौऱ्याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

Leave a Reply