खा. उदयनराजे यांचा पुरस्थितीवरून सरकार-प्रशासनाला इशारा

नवी दिल्ली : २५ जुलै – पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुरस्थितीवरून सरकार-प्रशासनाला इशारा दिला आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला. रायगड, सातारा जिल्ह्यात तर निसर्गाचं रौद्र रुप बघायला मिळालं. घरांवर दरडी कोसळल्य. असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणं आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे, मदत कार्य करताना जनतेला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply