भारताला टोकयो ऑलम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक, मीराबाई चानूची विजयी सलामी

टोकयो: २४ जुलै – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात ८७, तर क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचललं. मीराबाई चानू ही मणिपूरची रहिवासी आहे. भारत आज शनिवारी काही स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावत आहे, हे विशेष.
भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ऑलिपिंक स्पर्धेमध्ये भारताचे पहिलेच पदक जिकंले असून, यासोबतच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते. या खेळात चीनच्या झू लिजुनच्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.
पहिल्या दिवशी तिरंदाजीत देशाला फारसे यश मिळू शकलं नाही. महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव याने शेवटच्या राऊंडमध्ये केलेल्या चुकीचा मोठा फटका भारताला बसला. तिरंदाजीच्या मिश्र गटात प्रवीण आणि भाराताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीचा यांचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. शेवटच्या क्षणी प्रवीणचा खराब फटका भारतीय टीमसाठी भारी ठरला. प्रवीणला शेवटच्या क्षणी फक्त ६ पॉईंट्स मिळाले. ही खराब कामगिरी भारताच्या तिरंदाजीतील पराभवाचं कारण ठरली.

Leave a Reply