११० मेंढ्या व १० बकऱ्यांसह चराईला गेलेला इसम झाला बेपत्ता

चंद्रपूर : २३ जुलै – राजुरा तालुक्यातील देवाडा या गावातील रहवासी ब्रम्हया उडतलवार (६०) यांच्या मालकीच्या ११० मेंढया व १० बकऱ्या चराई करिता घेऊन ते २१ जुलै ला सकाळी सिद्धेश्वर जंगलात गेले. दरम्यान नेहमीप्रमाणे सायंकाळ झाली तरी वडील घरी न आल्याने त्यांच्या मुलाने शोधकार्य सुरु केले. परंतु रात्र झाल्याने पाहिजे तसा शोध घेता आला नाही.
दुसऱ्या दिवशी पासून शोधकार्याला गतीप्राप्त झाली असली तरी मुसळधार पावासामुळे व्यत्यय येत होता. गुरुवारी या संपूर्ण प्रकाराची माहिती रात्रौ उशिरा तहसील कार्यालय राजुरा येथिल आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. तर जवळपास ४८ तास लोटूनही वडील व १२० बकऱ्यांचा शोध न लागल्याने वीरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे. गावातील नागरिक सिद्धेश्वर जंगलात शोध घेत आहेत.

Leave a Reply