अग्निशामकच्या जवानाने वाचवले तलावात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे प्राण

नागपूर : २३ जुलै – शहरातील गांधी सागर तलावात उडी घेत एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागपूर मनपातील अग्निशामक जवानाला दिसताच त्यांने स्वतः तलावात उडी घेऊन त्या ५४ वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला. प्रसंगावधान राखल्याने त्या व्यक्तीवर जीव वाचल्याने सध्या नागपूरच्या खाजगी रुग्णलायत उपचार सुरू आहे. रवींद्र मधुकर महाले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर विक्रम डोमे असे अग्निशामकच्या जवानाचे नाव आहे.
रवींद्र मधुकर महाले हे नेहरू नगरचे रहिवासी असून त्यांनी २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गांधी सागर तलावात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी गंजीपेठ अग्निशामक विभागाचे दोन कर्मचारी यंत्रचालक विक्रम डोमे आणि शंकर बीजवे हे दोघेही ड्युटी संपल्याने घराच्या दिशेने जात होते. त्यांना घटना नजरेस दिसताच, त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी विक्रम डोमे यांनी तलावात उडी घेत रवींद्र महाले यांना पाण्यातून बाहेर काढले. यावेळी त्यांच्या पोटात पाणी गेल्याने प्राथमिक उपचार करून पाणी बाहेर काढत उपचार करण्यात आले.
या घटनेची तत्काळ माहिती स्थानिक गणेशपेठ पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी रवींद्र महाले यांना सुरुवातीला उपचारासाठी मेयोमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचार केले असतांना त्यांच्या पोटात तलावातील घाण पाणी गेल्याने त्यांचा शरीरात इन्फेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांना खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनेची नोंद घेत तपास सुरू करण्यात आला. मात्र, आत्महत्येच्या प्रयत्नामागचे नेमके कारण कळू शकले नसल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशामन दलाचा जवान हा केवळ आग विझवण्याचेच काम करतो असे नाही. तो 24 यास लोकांचे जीव वाचवण्यासाठी कर्तव्यावर असतो. याचीच प्रचिती या प्रसंगातून घडते. यात दोघांच्या प्रसंगावधाने त्या व्यक्तीला जीवनदान मिळाले, याचा आनंद असल्याची भावना मनपाचे मुख्य अग्निशामक अधिकारी राजेंद्र उचके यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केली. यासाठी जवानाच्या शौर्याची, या कामगिरीची दखल महानगरपालिका नक्कीच घेईल. तसेच योग्यवेळी यथोचित त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply