चंद्रपूर : २२ जुलै – जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या उमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मूळच्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरटोला या गावचा रहिवासी असलेला उमेश नैताम हा हत्या प्रकरणात येथे शिक्षा भोगत होता. दुपारच्या सुमारास बॅरेक क्रमांक सहाच्या स्वच्छतागृहाचे मागे कैद्याने गळफास लावून घेतल्याचे सुरक्षेत तैनात शिपायाला दिसले. त्याला खाली उतरवून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासनीनंतर कैद्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याची माहिती तुरूंग अधिकारी आत्राम यांनी दिली. घाम पुसण्याच्या पांढऱ्या दुपट्ट्याने गळफास लावल्याचेही त्यांनी सांगितले.