वन्यप्राण्यांची शिकार करणारी टोळी गजाआड

वर्धा : २२ जुलै – मागील अनेक महिन्यांपासून वडनेर परिसरातील वेणी, जांगोणा, खेकडी, सावंगी (जोड) शेकापुर (बाई) दोंदूडा, खापरी आदी शिवारात वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत होती. नुकतेच राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत मृत पावलेले हरीण पळवून नेले. याबाबत वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर दखल घेत वनविभागाने वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी नुकतीच गजाआड केली.
यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यामधील शिकारी टोळी मागील काही दिवसापासुन पोहणा नियत क्षेत्रात येवुन वन्यप्राणी ससा, लावा, तीतर, घोरपडी, काळविट इत्यादी वन्यप्राण्याचे शिकार करून नेत असल्याची गोपनीय माहीती वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यांनी पहाटे च्या सुमारास मौजा खेकडी गावात सापळा रचुन वनक्षेत्रात शिकारीसाठी गेलेले आरोपींना पकडण्यासाठी बसले.
सकाळी ८ च्या दरम्यान भरधाव दुचाकी क्रमांक एम.एच.१४ इ.टी.0३७८ या दुचाकीवर तीन इसम येताना दिसुन आल्याने त्यांना थांबवुन त्यांची झडती घेतले असता त्यांचेकडे वन्यप्राणी ससे ९ नग , तीतर १ नग व लाव्हा १ नग तसेच शिकारीसाठी उपयोगात येणारे साहित्य आढळुन आले. मौक्यावर आरोपींना विचारपुस केले असता त्यांनी सदर वन्यप्राणी मौजा चंद्रपूर जिल्ह्यातील माढेळी ता.वरोरा येथुन पकडुन आणल्याचे सांगितले.
यावरून वनरक्षक सज्जन यांनी घटनास्थळी मदतीसाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांना बोलावुन घेवुन घटनास्थळाचा पंचनामा केला यातील आरोपी नामे अजय मेहबूब काळे (२७), निळकंठ पंजाब पवार(२८) रा. दोघेही गोपालनगर तालुका राळेगाव, अनिल गुलाब पवार रा. उमरी जिल्हा यवतमाळ या तीनही आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ ३९(२), ५२,४८(ए),२(३६),५0 (१) (सी),६0 अन्यये वन गुन्हा /२0२१ नुसार गुन्हा दाखल केला. यातील आरोपींकडून वन्य प्राणी शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये दोन मोबाईल, दोन एलईडी टॉर्च, बॅटरी सट, वन्य प्राणी पकडण्याचे जाळे, प्राणी ठेवण्याचे पोते जप्त करण्यात आले. वरील तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय वर्धा येथे नेऊन रात्री वन कोठडीत ठेवण्यात आले.

Leave a Reply