‘पॉर्न’ नव्हे अश्लील! अटकेनंतर राज कुंद्रांची न्यायालयात भूमिका

मुंबई: २२ जुलै- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत नसल्याचा युक्तीवाद केला. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची म्हणजेच पॉर्नची निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केला.
प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवतानाचे साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील असं म्हणता येईल, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला.
या प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. कुंद्रा यांनी अश्लील पॉर्नोग्राफिक व्हिडीओंचं प्रसारण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने कुंद्रा यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी अपवादात्मक परिस्थितीत देण्यात यावी. पोलीस कोठडी हा आदर्श पर्याय नाही. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. या प्रकरणामध्ये आरोप असणाऱ्याला अटक करुन तपासामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं आहे. ही अटक कायद्यानुसार झालेली नाही, असं पोंडा यांनी बाजू मांडताना म्हटलं.

Leave a Reply