धरणाच्या सांडव्याचे पाणी शेतात शिरल्याने अनेकांचे नुकसान

वाशीम : २२ जुलै – वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळनाथ तालुक्यातील सावरगाव कान्होबा या गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती धरणाच्या सांडव्याचे पाणी शेत शिवारात शिरल्याने शेती पूर्णपणे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज, २२ जुलै सकाळी घडली. सावरगाव कान्होबा येथे पाटबंधारे विभागद्वारा निर्मित प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग धरण पूर्णपणे भरल्याने होत आहे. धरण क्षेत्रात काल रात्रीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या सांडव्यातून प्रचंड पाण्याचा प्रवाह होत आहे.
सांडव्यातील पाण्याने महापुराचे उग्ररूप धारण केल्याने सावरगाव कान्होबा येथील शेतकरी शंकर प्रल्हाद राठोड, गोवर्धन सूर्यभान राठोड, देविदास रामधन राठोड, दत्ता रामधन राठोड,गणेश हुनासिंग राठोड, विजय मोहन राठोड आणि इतरही शेतकर्यांच्या शेतातून वाहून गेल्याने संबंधितांना जबर नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या डौलाने उभ्या पिकातून पुराचे पाणी गेल्याने पिके आणि शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पुराच्या प्रवाहाने शेती खरडून जाऊन शेत शिवाराला नदीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

Leave a Reply