दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाच्या धाडी

नवी दिल्ली: २२ जुलै- दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या देशभरातील विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापेमारी केली. दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.
करचोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply