बुलडाणा : २१ जुलै – बुलडाणा जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात सध्या लाखोंची बोली यावर लावली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा जणू काही रोजच जिममध्ये जातोय.
हा टायगर बोकड ताकदीने एव्हडा मजबूत की, दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. करवंड येथील टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत. असा हा टायगर, मात्र या टायगवर लाखोंची बोली लागण्याच कारणच वेगळच आहे आणि ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः “अल्लाह” उमटलेल आहे. त्यामुळे जाणकार अस सांगतात की ज्यांच्याकडे असे जनावरे आढळतात त्यांना नशिबवान मानलं जातं.
जसजस लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली तसतशी याची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 36 ते 51 लाखांपर्यंत याची मागणी झाली आहे. परंतु आपल्या बोकडाला जवळपास 1 कोटींपर्यंत किंमत मिळावी अशी अपेक्षा बोकड मालकाची आहे.
लखपती असलेला हा टायगर आता नेमका कितीची मजल गाठतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सांगलीतील एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली होती. ज्याची किंमत सुद्धा लाकोमध्ये लावण्यात आली होती.