पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : २१ जुलै – आज देशभरात मोठ्या उत्साहानं ईद – अल – अजहा अर्थात बकरी ईद साजरा केला जातोय. या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व देशवासियांना ईद मुबारक! ईद-उझ-जुहा हा प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनां प्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसंच सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी एकत्र काम करण्याचा सण आहे. याच निमित्तानं आपण कोविड – १९ च्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आणि सर्वांच्या आनंदासाठी काम करण्याचा संकल्प करू’ असं ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलंय.
तर, ‘ईद मुबारक! ईद अल अधाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सामूहिक सहानुभूति, सद्भाव आणि अधिकाधिक सेवा समावेशकतेच्या भावनेला पुढे घेऊन जावो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
बकरी ईद हा सण ‘कुर्बानी दिवस’ म्हणूनही ओळखला जातो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार, रमजानच्या दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते. सामान्यत: आजच्या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो त्यामुळे भारतात ईद-अल-अजहा हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जातो. या धार्मिक प्रक्रियेला ‘फर्ज-ए-कुर्बान’ म्हटलं जातं.

Leave a Reply