अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता

मुंबई: २१ जुलै- पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. राजसोबत रायन थार्पला देखील पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आता याप्रकरणी लवकरच राजची बायको आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टी ही राजच्या जवळपास सर्व कंपन्यांमध्ये भागीदार आहे. या सर्व प्रकरणाची शिल्पाला कल्पना होती का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यामुळे लवकरच शिल्पाला चौकशीसाठी बोलवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भरांबे यांनी सांगितले की, शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे आतापर्यंत झालेल्या चौकशीत स्पष्ट झालेले नाही. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply