यवतमाळ: २० जुलै- स्वतंत्र्य विदर्भ राज्यांची त्वरित निर्मिती व्हावी, यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ९ ऑगस्टला विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक, नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली.
गेल्या ११६ वर्षांपासून वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू आहे. आता या सरकारने तत्काळ वेगळा विदर्भ करावा, यासाठी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी महिला प्रमुख रंजना मामर्डे, डॉ. विजय चाफले, अशोक कारमोरे, प्रा. हेमंत मुदलीयार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.