चंद्रपूर: २० जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील घोसरी गावाजवळ दीड वर्षाच्या वाघाचा मृतदेह सोमवारी आढळून आला. या मृत्यूच्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. आता त्याचे शवविच्छेदन केले जाणार असून, मृतदेह उत्तरीय तपासणी साठी चंद्रपूर येथील टीटीसीला नेण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येईल, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा गाभा क्षेत्राचे उपसंचालक यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी वाघाच्या मृत्यूच्या संभाव्य कारणाचा तपास करीत आहेत.