अश्लिल चित्रपटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक


मुंबई: २० जुलै- अश्लिल चित्रपट चित्रीत करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर कुंद्राला अटक करण्यात आली. यापूर्वी याच प्रकरणात अभिनेत्री गेहना वशिष्टला अटक झाली होती, आता राज कुंद्राच्या अटकेनं सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अभिनेत्री शेर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या जबाबनंतर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वप्रथम सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने राज कुंद्राचा जबाब नोंदवला होता. शिवाय सेलने सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणी एकता कपूरचादेखील जबाब नोंदवला होता. दरम्यान, राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शिवाय अभिनेत्री शेर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या जबाबात त्यांना अडल्ट इंड्रस्टीमध्ये आणणारा राज कुंद्रा होता असे म्हंटले आहे. राजने शेर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी ३० लाख रूपये दिले असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शेर्लिनने राज कुंद्रासोबत जवळपास २० प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.

Leave a Reply