संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या – पश्चाताप करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण

भंडारा: १९ जुलै- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस ठाण्याअंतर्गत राजेदहेगाव येथे घडली. त्यानंतर पतीने पश्चाताप करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर, असे मृत महिलेचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यातील स्नेहलताचा विवाह २०१५ साली भंडारा जिल्ह्यातील मेहरबानी येथील लंकेश्वर खांडेकर यांच्यासोबत झाला.
लंकेश्वर हा आयुध निर्माणी जवाहर नगर येथील कॅन्टीनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. विवाहानंतर काही वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर लंकेश्वर हा स्नेहलता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यातून त्यांचे खटके उडू लागले. दोघांमध्ये भांडण झाले असता, यादरम्यान लंकेश्वर याने स्नेहलताचा गळा ओढणीने आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. सकाळी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने त्याने थेट जवाहर नगर पोलिस स्टेशन गाठले पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे त्याला तीन वर्षाचा मुलगा आहे.

Leave a Reply