शिक्षकाचा बनावट गुटखा निर्मितीचा कारखाना- पोलिसांची धाड

अमरावती: १९ जुलै- अमरावती जिल्ह्यातील अंजनगावजवळील धाडी गावात संदीप जाधव नावाचा पेशाने शिक्षक असलेला तरुण बनावट गुटखा कारखाना चालवत होता. बनावट कारखाना अंजनगाव पोलिसांनी उघडकीस आणून एकास अटक केली. सदर्हु कारवाई मध्यरात्रीपर्यंत चालू होती व बनावट गुटखा निर्मिती प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
अंजनगाव परिसरात गुटखा विक्री जोरात सुरु असताना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय विशाल पोळकर आणि सहकारी पीएसआय गणेश सपकाळ अनेक दिवसांपासून गुटखा माफियावर नजर ठेवून होते. डोंगराळ भागात वसलेल्या धाडी येथे बनावट गुटखा कारखाना सुरु असून पेशाने शिक्षक असलेला संदीप जाधव हा सुत्रधार असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्रभारी ठाणेदार विशाल पोळकर यांनी सापळा रचला. कारवाई रात्री करण्यात आली. कारवाईत अनेक नामांकित कंपनीचा बनावट गुटखा पाऊच व पॅकिंग मशीनसह 1 लाख 39 हजार 30 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply