वाघ आणि बिबट्याचा तीन शेतकऱ्यांवर हल्ला – एकाचा मृत्यू

चंद्रपूर: १९ जुलै- चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलव्याप्त परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. गेल्या २४ तासात सावली तालुक्यातील सामदा (बुज), ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा व सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव (लोनखैरी ) येथे वाघ आणि बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी आहेत. काशिनाथ तलांडे असे मृतकाचे, तर विठ्ठल गेडाम, ज्ञानेश राऊत अशी जखमींची नावे आहेत.
सावली तालुक्यातील सामदा (बुज) येथील शेतकरी विठ्ठल गेडाम सायंकाळी शेताकडे पाहणी करायला जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली. पण, शेतकऱ्याने आरडाओरड करीत वाघाच्या पाठीवर काठीने वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीतून त्याने आपला जीव वाचविला. व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरातील वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतीची कामे खोळंबली आहे. त्यामुळे तात्काळ बिबट आणि वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी रेटून धरली आहे.

Leave a Reply