वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शेम ! शेम ! शेम !

काल ईडीने आमच्या साहेबांच्या
प्रतिष्ठानांवर धाड मारली !
आणि काय तर म्हणे त्यांची साडे चार कोटींची संपत्ती जप्त केली !
अरे, ज्यांच्या पॅन्टचे खिशे जरी उलटे केले तरी पाच सहा कोटी सहज पडतील
त्यांच्यावरच्या धाडीतून मिळाले काय तर म्हणे फक्त साडेचार कोटी !
हा भयंकर अपमान आहे आमच्या साहेबांचा !
अरे ते काय भुरटे चोर बिर लागले काय फ़क्त साडेचार कोटी सापडायला !
हे म्हणजे आमच्या साहेबांच्या बदनामीचं षडयंत्र आहे !
शेम ! शेम ! शेम !
खऱ्या सोन्याला सोनाराने आगीत तापवलं, आणि ठोक ठोक ठोकलं त्याचं दुःख वाटत नाही !
पण , दुःख वाटते ते क्षुद्र गुंजेबरोबर तोलल्याचं !
साडेचार ऐवजी चार हजार कोटी असते तर आम्हाला इतकं दुःख झालं नसतं !
पन्नास वर्षांपासून राजकारणात मोठमोठी पदं भूषविणाऱ्याकडून फक्त साडे चार कोटी जप्त करायला
त्या ईडीलाही जर लाज वाटायला पाहिजे होती !
शेम ऑन ईडी !
शेम ! शेम ! शेम !

कवी — अनिल शेंडे .

Leave a Reply