बकरी ईदसाठी कोरोनासंदर्भातील नियम शिथिल का केले?, सर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला सवाल

थिरूवनंतपूरम: १९ जुलै- केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोरोनासंदर्भातील नवीन नियमांची नुकतीच घोषणा केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली. यानंतर देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली असून, सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितलं आहे. आता या प्रकरणावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रा रद्द केल्यानं त्या संदर्भातील याचिका बंद करण्यात आली आहे.
‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये कोरोना परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते, असं आयएमएचं म्हणणं आहे. आयएमएनं केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ही सूट दिल्याने राज्यात करोनाचं संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत आयएमएनं दिले आहेत.

Leave a Reply