बोगस बियाणेग्रस्त शेतकर्‍यांनी तक्रारी द्याव्या : खा. भावना गवळी

वाशीम:१८ जुलै- शेतकर्‍यांनी कुठल्या कंपनीचे बियाणे खरेदी केले, किती क्षेत्रामध्ये बियाणे उगवले नाही. हया सर्व बाबींचा शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तक्रारी देण्याचे आवाहन खा. भावना गवळी यांनी बोगस बियाणेग्रस्त शेतकर्‍यांना केले आहे.
कोविड १९ कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकरी पहिलेच अडचणीत आला असताना यावर्षी बर्‍याच भागामधून पेरणी केलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी सेवा केंद्राच्या दुकानदारांनी विविध कंपन्याचे बियाणे शेतकर्‍यांना विकत असताना शेतकर्‍यांनी बियाणे चांगले उगवून पीक चांगले येणार या खात्रीवर बियाणे खरेदी केलीत. परंतु, बर्‍याच शेतकर्‍यांनी खरेदी केलेली बियाणे उगवलेच नसल्यामुळे पहिलेच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोगस सोयाबीनच्या बियाण्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर काही ठिकाणी कृषी अधिकार्‍यांनी तपासणी केली असता बियाण्यांची केवळ १० टक्के उगवणक्षमता असल्याचे निदर्शनात आले व त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

Leave a Reply