ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे निधन

पुणे: १८ जुलै- ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. अनंत मनोहर यांनी कादंबरी, कथा, ललिस, स्फुटलेखन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. शिवाय, क्रिकेटवर देखील त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं विशेष लोकप्रिय ठरली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर ललित लेखन केलं आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.

Leave a Reply