गोंदिया : १७ जुलै – अर्जुनी मोर तालुक्यातील ताडगाव येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी रात्री ८ वाजता दरम्यान गॅसचा सिलेंडर लिक झाल्याने त्यांच्यासह घरील चार जण व एक शेजारी गंभीररित्या भाजल्याची घटना घडली.
पंधरे कुटूंंबायांनी रात्री जेवनापूर्वी अन्न गरम करण्यासाठी गॅस शेगडी पेटविली. मात्र पूर्वी लिक असलेल्या सिलेंडरमधील गॅस खोली पसरलेली असल्याने शेगडी पेटवताच आगीचा एकच भडका उठला. यात नीताराम वासुदेव पंधरे, भागरता वासुदेव पंधरे, प्रकाश वासुदेव पंधरे, प्रभू पंधरे, रसिका पंधरे व शेजारी राहणारे कवडू महागु बनारसी हे गंभीररित्या भाजले गेले. त्यांंच्यावर अर्जुनी मोर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले.