हिंगणा परिसरात दोनदा बिबट दिसल्याने वनविभागाने पाऊले उचलली

नागपूर : १६ जुलै – हिंगणा वनपरिक्षेत्रातील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात एकाच आठवडय़ात दोनदा बिबट दिसल्याने वनविभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बिबटय़ाच्या शोधासाठी वनविभागाच्या पथकासह राज्य राखीव पोलीस दलाच्या पथकाचे सहकार्य घेण्यात येत आहे.
या परिसरातील नागलवाडी गावाजवळ नऊ जुलैला गावकऱ्यांना बिबट दिसला. आयुध निर्माणीचे सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर हिंगणा वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळावर पोहोचले. कर्मचाऱ्यांनी बिबटय़ाच्या पाऊलखुणांचे चित्र घेत अंबाझरी जैवविविधता उद्यानातीलच हा बिबट तर नाही ना, याचा तपास सुरू के ला. दरम्यान, गुरुवारी १५ जुलैला पुन्हा आयुध निर्माणीतील १० व ११ नंबरच्या चौकी परिसरात मध्यरात्रीनंतर दीड वाजता सुरक्षा दलाचा जवान भगतसिंग यांनी बिबट पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा अडीच वाजता कार्यवेक्षक पी.एल. पोटभरे यांनी नऊ नंबरच्या चौकीजवळून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बिबटय़ाला पाहिले. वनखात्याला कळवल्यानंतर हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी या परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. वनविभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबटय़ाचा शोध सुरू के ला आहे. हा बिबट अंबाझरीतीलच असून अंबाझरी आयुध निर्माणीचा हा परिसर जंगलव्याप्त व वन्यप्राण्यांसाठी उत्कृ ष्ट अधिवास आहे. अंबाझरी जैवविविधता उद्यानापेक्षा हा परिसर मोठा असल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र, परिसरातील गावकऱ्यांनी, नागरिकांनी एकटे फिरू नये. समूहानेच वावर करावा. शेतात जाताना काठी सोबत ठेवावी, असे आवाहन उपवनसंरक्षक (प्रादेशिक) भारतसिंग हाडा यांनी के ले आहे.
या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. नागरिकांनी कु ठेही बिबट दिसल्यास सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या वन्यप्राणी बचाव पथकाशी दूरध्वनी क्र . ०७१२-२५१५३०६ येथे तसेच वनखात्याचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply