सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

कुचलिया वृक्षाची फळे

प्रशांत किशोर हे गांधी परिवाराला भेटायला गेले आणि विविध बातम्यांचे पेव फुटले. कोणी म्हणे हत्ती खांबासारिखा, कोणी म्हणे हत्ती सुपासारिखा, कोणी म्हणे हत्ती कुंचल्यासारिखा.
नाना त-हेच्या चष्म्यातून ह्या भेटीला बघितल्या गेले आणि आपापल्या परीने जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्या गेला. काही म्हणाले राहुल गांधी ना चमकवायची शेवटची संधी, म्हणून भेट तर कोणी म्हणे २०२२ उत्तर प्रदेश इलेक्शन सरतेशेवटी एक निष्कर्ष निघाला की २०२२ राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी शरद पवार ह्यांचे नाव. ह्या संदर्भात मी जे भाकित केले आहे १३ जूनला त्याची लिंक आपल्या संदर्भासाठी सगळ्यात शेवटी देत आहे.
मागील काही दिवस आघाडी सरकारचे बघता ह्या सरकार वर भ्रष्टाचाराचे लांछन सतत लागत आहे. शिवसेनेने आपली हिंदूत्व वादी निती बदलली आहे. आता शिवसेना हिंदू समाजाला भरवशाची नाही राहिली. मुख्यमंत्री जनतेसमोर गोडवे गातात हिंदू समाजासाठी मात्र कृती एकदम विपरीत वागतात. अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. पालघर प्रकरण, ओबीसी आरक्षण,मराठा आरक्षण आणि मुसलमानांना देण्यांत येणारे आरक्षण. त्यामुळे शिवसेना आता विश्वासार्हता गमावून बसली आहे आणि अशात निघालेले त्यांचे वाझे प्रकरणाने. व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण ढवळून निघाले आहे.
फडणवीस जसे म्हणाले होते की हे सरकार आपापल्या कलहाने पिडीत होवून पडेल. ती चिन्हे तर दिसत नाही कारण आपापसातील कलह मात्र विकोपाला जातो आणि केवळ भाजपा सत्तेत नको ही मांडवली होते आणि नवीन अंतर्गत कलहाकडे मविआ ची वाटचाल सुरू राहते. आणि फडणवीसांचा “करेक्ट कार्यक्रम” परत एकदा थंड्या बस्त्यात जातो. याचा अर्थ असा नाही की मविआ आघाडी सब आलबेल. त्यानंतर किरीट सोमय्या ह्यांनी ज्या पद्धतीने जमिन घोटाळा वगैरे प्रकरणं जनतेसमोर मांडण्याचा सपाटा चालवला आहे, त्यात निश्चितपणे, सर्वसामान्य जनतेला आता असे वाटायला लागले आहे की निवडणुकीत मोदीच्या नावाने मतं गोळा करून हिंदू मतदात्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि “आम्हाला ही पार्टी चालवायची आहे” (वाचकहो! आठवते ना? कोणी – केव्हा म्हटले) आणि शिवसेना अलगदपणे मॅडम आणि घडाळ्याच्या कुशीत विसावली.
आता म्हणाल हे पाल्हाळ कशाला? “गरज ही शोधाची जननी आहे”. बरे ! गोष्टी इथेच् थांबतात का? नाही ! त्यानंतर जो फटाका फुटला “वाझे” नावाचा आणि त्यात मग मनसुख हिरेन हत्याकांड, अॅंटिलिया स्फोटक प्रकरण, इथ पर्यंत सगळे ठीक होते. पण जेव्हा यादी मध्ये चक्क एक मोठे नाव आले त्यावेळी ,”गरज ही शोधाची जननी” ची आवश्यकता भासली. एवढे मोठे नाव – आणि फक्त दोन कोटी साठी. बेटा हमारा वजुद इतना छोटा!!! इससे तो वो छोटा “राजा” का नाम था, १.७२ लाख कोटी. आणि जेव्हा खुद्द गृहमंत्री ह्याला दुजोरा देतात, त्यावेळी दोन कोटींची विश्वासार्हता, सामान्य जनतेमध्ये जागृत होते. बरे! नानाविध कॉंग्रेसचे टोले का बरं??? आम्ही आता स्वबळावर लढू वगैरे वगैरे तर ह्यांची अजबच् कथा. सध्यातरी महाराष्ट्र सरकार मध्ये कॉंग्रेस म्हणजे एक स्वच्छ सरकार. कोणत्याही भ्रष्टाचाराचे शिंतोडे, ह्या सरकार मध्ये कॉंग्रेस वर उडालेले नाहीत आणि हीच् खरी गोम आहे. सगळे जितके काही शिंतोडे उडाले ते बाकी दोन पक्षांवर आणि म्हणून कॉंग्रेस ची बोंब आहे, “क्यु यार दोनो मिलके – हमको छोडके”
असो, भ्रष्टाचार विना कॉंग्रेस म्हणजे श्वासाविना शरीर. आणि मग जी काही कॉंग्रेस कडुन बरळ निघते, ही खरी खंत ही आहे की आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. म्हणजे आमच्या “वाटा” वेळ आली की वेगळ्या करता आणि शेवटी गरळ ओकली जाते.
असो…आपण होतो ते दोन कोटी ने शोध लावला की हे इमानदारीचं केंद्र सरकार काही केल्या आता सुधरू देणार नाही आणि आजपर्यंत कमावलेली पत पणाला लागली तर ह्यावर तोडगा काय? ह्यावर तोडगा एकंच् – भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणे आणि मग सर्व लागलेल्या गुन्ह्यांचा निबटारा करणे आणि मोदी सरकारची वासलात लावणे. वाचकहो! प्रत्येक बिलावर पारित झाल्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी अनिवार्य आहे. ह्या वरून तुम्ही विचार करू शकता की ह्या पदाचा आवाका किती मोठा आहे. ह्या पदावर जर एखादा चुकीचा व्यक्ती बसला तर भारताची दैना करु शकतो. NRC, CAA सारखी भारत देशासाठी चांगली असणारी, पारित बिले अडकवू शकतो. भारतातील गौप्य, बाबी उघड करु शकतो. ह्या पदावर बसणारी व्यक्ती ही धर्माने – राष्ट्रप्रेमी आणि वर्तनाने राष्ट्र हित साधणारी गरजेचे आहे. अन्यथा देशाचा “हमिद अंसारी” व्हायचा. दहा वर्षे “उपाध्यक्ष” पद उपभोगल्यावर साक्षात्कार व्हायचा की भारत देश राहण्याजोगा नाही. आणि पदावर विराजमान असताना त्यांनी केलेले बरेच कारनामे भारत विरोधी असल्याचे ऐकले आहे.
वाचकहो!!! प्रशांत किशोर माझ्यामते हा लोकशाहीतील आतंकवाद आहे आणि ह्याचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. मी माझ्या मागल्या लेखात स्पष्ट लिहिले आहे की “सुपारी घेऊन केलेल्या निवडणूका” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मंजूर नाही कारण त्याचा तसा उल्लेख नाही. आणि तरीही निवडणूक पुर्व ही सुपारी दिली जाते – मतदान घेतले जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला तिलांजली दिली जाते. ह्यासाठी केंद्र सरकारने बिल पास करणे आवश्यक आहे आणि ह्या भस्मासुराला भस्म करणे आवश्यक आहे.
समयाधीशांबद्दल बोलाल तर ते आपली योजना गुप्त पद्धतीने राबवतात. ह्याचा ताजा अनुभव म्हणजे – वैधानिक शिवसेनेने युती भाजपाशी केली आणि अप्रस्तुत-गुप्त-छुपी युती समय के साथ. आणि योग्य वेळ येताच त्यांनी ती उघड केली. त्यात त्यांनी पहिले शिवसेनेला उंदरासारखा खेळवला आणि आता सुद्धा वाघ, घडाळ्याच्या पंजात विसावला आहे. खंत वाटते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घडाळ्याच्या पंजात जखडली आहे.
तद्वतच हा राष्ट्रपती बनण्याचा त्यांचा जो मनसुबा आहे तो सुद्धा त्यांना गुप्त ठेवायचा आहे. तो उघड झाला तर स्पर्धा वाढते. आठवतं अमित शहांशी अहमदाबादची चर्चा विफल झाल्यावर समयाधीश, अज्ञातवासात गेले आणि तिथून सुत्र हालविले. त्यांनी मग बंगाल निवडणुकीत भाजपा ला अशी पटखनी दिली की कैलास विजयवर्गीय टीव्ही वरील एक ही इंटरव्ह्यू देण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी तिथुन पळ काढला होता आणि त्यांना मग पदच्युत करण्यात आले.
आता सुद्धा समयाधीश आपला मनसुबा गुप्त ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. पेपर फुटला की जास्त बोंब होते. आणि स्वतः ची पत राखायची असेल तर ऐपत वाढवावी लागेल – राष्ट्रपती बनून लांछनांवर कायमचे कुलूप लावता येवू शकते, त्यासाठीच समयाधीश प्रयत्नशील आहेत. प्रशांत किशोर ला आटोक्यात आणणे भाजपा ला शक्य नाही.
मात्र भाजपा एक उपाय करु शकते की “राष्ट्रपती पदासाठी उमेदवारीच्या वयाची अट ” घालून बिल पारित करु शकते. चालू गुन्ह्यांच्या तपासाचा वेग वाढवून, त्यात अपराध्यांच्या यादी मध्ये समाविष्ट नावांना इलेक्शन कमिशन नाकारु शकते. आणि भारताला विनाशाच्या गर्तेतून वाचवू शकते. व्यंकटेश स्तोत्रात एक ओळ आहे,”कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील”.
समृद्ध भारत, सुसंस्कारित भारत, सभ्य भारत हिंदू भारत भविष्यात बघायचा असेल तर अशा व्यक्तींना सर्वोच्च पदी विराजमान होण्यास रोखणे, हे आता भारत सरकारचे काम आहे आणि तुमच्या आमच्या हाती काहीच नाही. चला प्रार्थना करू या – भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे मनोकामना करु या, एवढेच तुमच्या आमच्या हाती शिल्लक आहे.

भाई देवघरे

Leave a Reply