प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ द्या : खा. प्रतापराव जाधव यांची मागणी

बुलडाणा: १५ जुलै- अस्मानी संकटाच्या मालिकेमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. मात्र, यंदा खरीप हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली, अशी मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय कृषिमंत्री व राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत ही १५ जुलै २०२१पर्यंत आहे. बुलढाणा जिल्ह्यात पीक पेरणीच्या कामास पावसाचा खंड पडल्यामुळे कामे थांबली होती. सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीपाची पेरणी आहे .अजूनही १८ टक्के पेरणी शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये खातेधारक शेतकरी संख्याही ५ लाख ८७ हजार ८४८ असून, १४ जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये १ लाख ६ हजार ४८५ शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. मात्र, हंगाम लांबणीवर पडल्याचे चित्र असल्याने योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply