दुचाकी आणि कारच्या धडकेत, दुचाकीवरील तीनही व्यक्तींचा जागीच मृत्यू

यवतमाळ : १५ जुलै – आर्णी मनपूरजवळ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर दुपारी ४.३० वाजता चुकीच्या दिशेने जाणारी दुचाकी व समोरून येणारी कार यांची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील तीनही व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली.
कुर्हा डुमनी येथील दीपक कचरू मसराम (वय ४०), संदीप सीताराम आत्राम (वय ४५, दोघेही कुर्हा डुमनी) व यवतमाळचे नथ्थू कुमरे हे तिघे दुचाकी क‘मांक एमएच२९ बीए १०४७ ने यवतमाळकडे चुकीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी बोरी-तुळजापूर चारपदरी महामार्गावर मनपूरजवळ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर कार क‘. एमएच२५ आर ५७३० चे मालक यशवंत वानखडे (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) हे नागपूरहून कळंबकडे जात असताना समोरून येणार्या दुचाकीशी टक्कर झाली.
या अपघातात दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. त्यांच्या डोके व गुप्तांगाला जबर मार लागला. यावेळी पाऊस सुरू असल्याने अपघात घडला असावा. घटनेची माहिती मिळताच आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, सपोनि नागेश जायले, जमादार विजय चव्हाण, मनोहर पवार, दिनेश जाधव, संजय भारती, अमित लोखंडे, अरुण राठोड, शिपाई मारोती मदने व अनेक नागरिक घटनास्थळी पोहोचले.
महामार्गावर पडलेली दोन्ही वाहने बाजूला करून मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन मृतदेह ग‘ामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचे वृत्त कुर्हा (डुमनी) येथे कळताच तेथे सर्वत्र शोककळा पसरली.

Leave a Reply