‘एम्स’नंतर ‘मिहान’मध्ये आता आणखी एक अद्ययावत रुग्णालय

नागपूर : १५ जुलै-महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) नागपुरातील एका कंपनीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिग होमसाठी भूखंड दिला आहे. यामुळे एम्ससोबत आणखी एक रुग्णालय मिहानमध्ये उभे राहणार आहे.
एमएडीसीने भूखंडाच्या खरेदीसाठी निविदेद्वार अर्ज मागवले होते. भूखंडासाठी अंजनी लॉजिस्टिक, डॉ. आशीष गंजारे क्लिनिक, शक्ती लाईफकेअर, स्पार्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. चेतन कुटेमाते यांचे गुरुश्रुती नेत्रालय आणि डॉ. राजेश गट्टानी यांच्यासह सहा अर्ज आले होते. नरेंद्र जिचकर यांनी सर्वाधिक बोली लावली. त्यांच्या अंजनी लॉजिस्टिकला जमीनवाटप पत्र देण्यात आले. गेल्या काही महिन्यांत एमएडीसीने आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी, विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन आणि आता आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला भूखंड दिले आहे.
याबाबत एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, करोनानंतर मिहानमध्ये सकारात्मकता परत आणण्यासाठी आणि मिहान प्रकल्पासंबंधित जी काही नकारात्मक धारणा असेल, ती बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply