उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, १३ राज्यांतील सर्वेक्षणातला दावा

नवी दिल्ली : १५ जुलै-देशात आज बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यांपासून पंजाब आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांच्यां मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच, पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे.
प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू, असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत मतं विचारण्यात आलीत.

Leave a Reply