कोल्हापूर : १४ जुलै – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. इतकेचन नाही तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासोबतच राज्यातील जनता पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला परत पाठवणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून अधिक जागा जिंकणार असा वारंवार रिपोर्ट येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी फिडबॅक घेत आहेत आणि फिडबॅक घेण्याची आवश्यकताच नाहीये. नागरिक आनंदी आहेत. लोकांना माहिती आहे की माझ्या घरात गॅस कनेक्शन यांनी आणलं आहे. लोकांना माहिती आहे की विरोधक पेट्रोल-डिझेल संदर्भात जे आंदोलन करत आहेत ते स्वत:च्या सरकारलाही विचारत नाहीत. 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारला घरी पाठवणार.
एकाने मारायचं आणि दुसऱ्यांन समजवायचं असा खेळ आपण लहानपणी खेळा. यसचं आता राज्य सरकारमध्ये एकाने बोलायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं की असं आम्हाला म्हणायचं नव्हतं. हा खेळ न कळण्याएवढी महाराष्ट्राची जनता मुर्ख नाहीये. यांना जनतेने मतदान केलेलं नसतानाही सरकार बनवलं. याची शिक्षा निवडणुकीत यांना मिळेल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हे सर्वजण हुशार आहेत आणि त्यांना माहिती आहे की अॅक्सिडेटली आपलं सरकार आलं आहे. सरकार आल्यापासून आपण खूप बदल्या करु शकल्या आहोत. वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे सत्तेची ताकद त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते एकमेकांसोबत भांडतील खूप पण सरकार पाडतील असं मला वाटत नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.