वीज पडून शेतकऱ्यांसह दोन बैलांचा मृत्यू

अमरावती : १४ जुलै – धारणीपासून १५ कि. मी. अंतरावरील दगड्या मोखा नावाच्या गावात दुपारी ३ च्या दरम्यान विजेचा प्रचंड कडकडाट झाला. गावातील ४० वर्षीय शेतकरी शंकर साबुलाल दहीकर हा यावेळी शेतात डवरा काढत होता. मात्र विजेचा तो बळी ठरला तर दोन्ही बैलसुद्धा विजेमुळे मरण पावले.
मोखा गावात वीज पडल्याची माहिती आमदार राजकुमार पटेल यांना माहिती पडताच त्यांनी वेळ न गमावता स्वतः प्रहारची रुग्णवाहिका चालवून घटनास्थळावर पोहचले. मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणून सोडले. मृतक शंकर हा आदिवासी असून घरात कर्ता पुरूष होता.
दोन्ही बैल सुद्धा मरण पावल्याने दहीकर कुटुंबावर समस्यांचा डोंगर कोसळला आहे. माजी जि. प. सदस्य श्रीपाल पाल यांनी मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. धारणी तालुक्यात मंगळवार, 13 जुलै रोजी दिवसभर पावसाने हजेरी लावली. दिवसभरात अनेक वेळा ऊन निघाले तर अनेक वेळा वीज चमकून पाऊस पडला.

Leave a Reply