मुंबई: १४ जुलै – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीसोबतच राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याविरोधात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र, त्याचा असा अर्थ असा नाही की, मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, ते चुकीचे ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही.
माझी कारकीर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केले ते सर्वच वाईट, अशी माझी भूमिका कधी नव्हती. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिले पाहिजे, २५ वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवासांपासून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणुक लढविण्याचे भाष्य करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रथमच यावर भाष्य केले आहे. आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोलेंना लगावला आहे.