भावांनी २७ कोटी रुपयांनी फसवले, बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

यवतमाळ:१४ जुलै- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बनावट खाते काढून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करून धनादेशाद्वारे तब्बल २७ कोटी रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार आपल्या भावांसह ९ जणांविरुद्ध बहिणीने वसंतनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यापैकी ८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री अजय मोरय्या (वय ४५, दरोगा प्लॉट, राजापेठ, अमरावती) यांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये आरोपी नंदकिशोर जुगलकिशोर जयस्वाल, रश्मी नंदकिशोर जयस्वाल, रवी जयस्वाल, तत्कालीन व्यवस्थापक आणि लेखापाल अकोला जनता कमर्शियल बँक शाखा, पुसद, सदाशिव नाना मळघणे, लक्ष्मीकांत चौधरी, रवी धुळधुळे, राजू कांबळे यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केली, असे म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे करीत आहेत.

Leave a Reply