भाजपचे हृदय हे दिल्लीच्या सत्तेसाठी धडधडत असले तरी त्यांचा मेंदू नागपुरात काम करतो – भूपेश बघेल

नागपूर : १४ जुलै – भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. पेट्रोल असो की जीवनावश्यक वस्तू सर्वांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे सांगत मोदी सरकार हे अपयशी ठरले आहे, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. जरी भाजपचे हृदय हे दिल्लीच्या सत्तेसाठी धडधड करत असले तरी दिमाग मात्र नागपुरात काम करतो आहे, असे म्हणत त्यांनी महागाई आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीला धरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलण्याची सुरुवात संघाकडे बोट दाखवत केली हे विशेष.
भाजपबद्दल काही बोलायचे असल्यास नागपुरात बोलणे गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्ननाना धरून प्रश्न विचारल्यास मोदी सरकार लोकांना भावनिक मुद्यांवरून भटकत असल्याचे छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल म्हणाले. यामुळे मूळ प्रश्नापासून दूर जात असले तरी प्रश्न सुटत नाही तर अधिक गंभीर होत चालले आहे. पण याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. देशातील सध्याच्या वातावरणामुळे लोकांचा जीव गुदमरायला लागला आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याने, व्यापाऱ्यांना जीएसटीने, युवकांना बेरोजगारीने मारले, अच्छे दिन येणाचे स्वपं नागरिकांनी रंगवले असतांना मोदीच्या महागाईने मारल्याचे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यावेळी म्हणालेत.
यात जीएसटी हा काँग्रेसचा मुद्दा होता. सुरवातीला मोदी सरकार विरोध करत होते. पण सत्तेत येताच चुकीच्या पद्धतीने रात्री लोकसभेत मंजूर करत लागू केला. यात मात्र मोदी सरकारने लोकांना सर्व करांपासून मुक्तता देऊ असा उल्लेख केला. मात्र त्यानंतर काहींना 5 टक्के काहींना 18 टक्के असे स्लॅब टाकत चुकीच्या पद्धतीने लागू केला. लोकांसोबत धोका करण्याचे काम केले आहे. वन नेशन वन टॅक्सचा नारा दिला पण परिस्थिती विपरीत म्हणजेच वन नेशन फाइव्ह टॅक्स अशी झाली आहे. कृषी यंत्रसामुग्री, खत, बियाणे, औषधे यावर तसेच कोरोनाच्या काळात यांत्रिक उपकरणांवर सुद्धा टॅक्स लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यावर वेगळया पद्धतीने जीएसटी लागू करून लोकांना दिलासा देण्याचे काम करू असेही आश्वासन त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळो परिस्थितीचे अवलोकन करून देण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना ट्रोल केले जाते, नंतर मात्र परिस्थिती बिघडल्यावर राहुल गांधी यांनी सुचवेलता पद्धतीवर काम केले जाते असेही ते म्हणालेत.
केंद्रीय वित्त मंती निर्मला सीताराम यांनी जेव्हा बजेट मांडले तेव्हा पेट्रोल डिझेलवर सेंट्रल एकसाईज टॅक्सवर 4 टक्के त्यांनी सेस लावला. यात या सेसचा वाटा राज्याला मिळत नसून सरळ केंद्राच्या तिजोरीत तो पैसा जात आहे. पण पुर्वी जेव्हा सेंट्रल एकसाईज ड्युटी लागत होती तेव्हा त्याचा वाटा राज्य सरकारला मिळत होता. यावर पत्र लिहून विचारले असतांना यावर कुठलेच उत्तर त्यांच्या मंत्रालयाकडून देण्यात आले नाहीत असेही छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले.
काँग्रेसचे काळात १९७७ मध्ये निवडणुकीत फॅमिली प्लॅनिंगचा मुद्दा मांडला आणि तेव्हा राबवला असता तर आज लोकसंख्ये इतके विक्राळ रूप धारण केले नसते. यात योगी सरकार म्हणतात दोन मुलं असले तरच सरकारी लाभ मिळणार, तीन मुले असली तर लाभ मिळणार नाही. पण ज्याना दोनच मुलं आहे त्या सर्वांना नौकरी देणार का, असा सवाल त्यांनी योगी सरकारच्या नवीन लोकसंख्या धोरणाला अनुसरुन विचारला. सामाजिक क्षेत्रातील काही मुद्दे हे कायद्याने न घेता सामंजस्य पध्दतीने जनजागरण करुन आणल्या जाऊ शकते असेही ते म्हणालेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्याने हे कार्ड खेळले जात आल्याचाही आरोप बघेल यांनी केला.
भारत हा देश युवकांचा देश आहे, तरुण देशाची ताकद आहे, असे पंतप्रधान म्हणत होते. पण आज समस्या झाल्याचे बोलत आहे. मोदी सरकार या युवकांना रोजगार देऊ शकली नाही. काँग्रेस सरकारने हातात घेतलेले उपक्रम बंद केले जात आहे. ओएनजीसी असो, स्टील प्लांट पावर प्लॅन्ट विकायला काढले आहे. रोजगार उपलब्ध करणारे सर्व देशातील मोठे मोठ्या संस्था विकायला काढल्या आहे. एअर इंडियाचे विमान विकायला काढले आहे. एअर इंडिया विकायला काढले आहे. यात हे विकण्याची जवाबदारी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिली आहे. यात एअर इंडियाचा लोगो हा महाराजा असून ‘महाराज आइये, हम दोनो बिकाऊ है एअरपोर्ट आणि सिंधिया’ अशा शब्दात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला. एका विकाऊला एअर इंडिया ही संस्था विकण्याची जवाबदारी दिल्याचे म्हणत बोचरी टीका छत्तीसगढचे मुख्यमंत्री बघेल यांनी केली. सर्वच विकून टाकणार असले तर मग रोजगार कोणाला आणि कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यात भाजपचे मोदी सरकार केंद्रात आल्यापासून ईडीचा गैरवापर होत आहे. ईडी मध्य प्रदेश, हरियाणा, यूपी या राज्यात नाही जाणार. ईडी भाजपशासित राज्यात नाही जाणार पण गैरभाजप सत्ता असलेल्या राज्यात ईडी जाईल, असा आरोप छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केला. तसेच भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत ईडी सीबीआय, आयबी केंद्रीय तपास यंत्रणा आहे. त्यांचा गैरउपयोग केला जात आहे. यात भाजपा एकटी लढत नसून त्यांच्यासोबत ईडी पार्टी, सीबीआयपार्टी, आयबीपार्टी असे नामकरण करत हे सुद्धा लढत असल्याचा आरोप छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Leave a Reply