बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर : १४ जुलै – चंद्रपुरातील सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. हि घटना मंगळवारच्या रात्री घडली. गंगुबाई रामदास गेडाम (६१) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व्याहाड येथील नियत क्षेत्र सामदाअंतर्गत येत असलेल्या व्याहाड बूज येथे रात्रीच्या सुमारास महिला ही आपल्या घरी झोपली होती.
यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला करत ओढून घराच्या बाहेर नेले व तिला जागेवरच ठार केले. सदरची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेचे शव उत्तरीय तपासणीकरिता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात वन्यप्राण्यांमुळे दहशत पसरली असून नागरिक भयभीत झालेले आहेत.

Leave a Reply