श्रीनगर::१४ जुलै-जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. सुरक्षा जवानांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त करण्यात आली आहे.ठार करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची ओळख पटली असून, एजाज उर्फ अबु हुरैरा असं त्याचं नाव आहे. तर इतर दोन दहशतवादी स्थानिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखील पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले. दरम्यान, चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.