१९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य, माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली: १3 जुलै- माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज मंगळवारी निधन झाले. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. वर्ल्ड कपसाठी यशपाल शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी केली होती. यशपाल शर्मा यांनी भारतासाठी एकूण ३७ मॅचेस खेळल्या होत्या. त्यांनी एकूण ४२ वनडे मॅचेस खेळल्या होत्या, मात्र, वर्ल्ड कपनंतर यशपाल शर्मा यांच्या करियरला चढता आलेख दिसला नाही.

Leave a Reply